HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप म्हणतं राष्ट्रवादीकडून पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न, तर आजित पवार म्हणाले….!

पुणे। “साधेपणाने मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचा होता. म्हणून पुणे मेट्रोच्या ट्रायल रनचे उद्घाटन सकाळी सात वाजता करण्यात आले. ही फक्त ट्रायल रन होती. आता ट्रायलला पण भडकता की काय ?” असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना केला. पुणे मेट्रोच्या ट्रायल रनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 7 ऑगस्ट रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील तसेच मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्यानंतर अजित पवार यांनी वरील भाष्य केले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुण्याच्या मेट्रोविषयी बोलताना अजित पवार म्हणाले

व्याऱ्यांची मागणी तसेच कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आज पुण्यातील निर्बंध शिथील करण्यात आले. या निर्बंधानुसार पुण्यात वेगळी नियमावली जाहीर करण्यात आली. या नियमावलीविषयी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी पुण्याच्या मेट्रोविषयी बोलताना “प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. ही फक्त ट्रायल रन होती. आता ट्रायलला पण भडकता की काय ? एकदा सुरुवात करायची होती. कार्यक्रम झाला की त्याला प्रसिद्धी मिळते. लोकांना कुठपर्यंत काम झालं त्याची माहिती मिळते. ते स्वत: व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होतेच. शहराचे प्रथम नागरिक होते. काही इतर आमदार होते. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घ्यायचा होता. म्हणून तो सकाळी सातला ठेवला,” असे अजित पवार म्हणाले.

पुणे मेट्रोच्या कामाचे उद्घाटन

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 30 जुलै रोजी पार पडले. सकाळी 7 वाजताच हा कार्यक्रम पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 7 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर मेट्रोची ट्रायल रन अजित पवारांच्या उपस्थितीत झाली असली तरी मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं जाईल असं भाजपचे स्थानिक नेते सांगत आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC परीक्षा रद्द करुन सरकारने एकाच जातीचा विचार केला, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

News Desk

‘म्याव म्याव’ करणारे लपून बसलेत, दीपक केसरकर यांचे नितेश राणेंवर टीकास्त्र

Aprna

भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इम्रानअली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

News Desk