HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, महाविकासआघाडीतील असंतुष्ट नेत्यांचे प्लॅनिंग | चंद्रकांत पाटील

पुणे | महाराष्ट्र कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदे नियुक्त करण्याचा प्रस्ताव महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळाने घेतला असून राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे महाविकासआघाडीने पाठवलेला प्रस्ताव बेकादेशीर असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे आमदार होऊ नये, आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, महाविकासआघाडीच्या काही असंतुष्ट नेत्यांचे प्लॅनिंग आहे, पाटलांचा गौप्यस्फोट केला आहे.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ” राज्यपालांनी हा प्रस्ताव मान्य करू नये , असे महाविकासआघाडीतील काही नेत्यांना वाटते. म्हणजे उद्धव ठाकरे हे आमदार होऊ नये, जेणे त्यांना त्यांच्य मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. हे महाविकास आघाडीतीलच काही नेत्यांची प्लॅनिंग आहे, अशा खळजनक खुलासा त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहे. यामुळे राज्यच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मित्रहो आम्ही दिलेला शब्द जपला…’आरे’च्या जागेवरून आव्हाडांचे ट्विट ! 

News Desk

‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांसाठी 10 हजारांची फौज आणत, शस्त्र पुरवतो’, शिवसेना आमदाराचं वादग्रस्त विधान

News Desk

लातूरमध्ये मेट्रो आणि लोकलच्या डबेनिर्मितीचा प्रकल्पाला मंजूरी

News Desk