HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी कलाकारांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा, आशिष शेलारांकडून सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना फोन!

मुंबई। लाँकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या मराठी कलावंतांनी आज राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन केले. यातील एक आंदोलन आज दादर हिंदमाता येथे दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. आम्हाला आमचे म्हणणे सरकार पुढे मांडू द्या, अशी विनंती हे कलावंत सरकारकडे करीत होते. पण सरकारकडून चर्चेला वेळ मिळत नव्हती. अखेर या कलाकारांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊनच ठिय्या मांडला.

आशिष शेलारांची धाव

तर भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत सोबत स्थानिक आमदार कालिदास कोळबंकरदेखील होते. त्यांनी अभिनेते विजय पाटकर आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या आंदोलनाला समर्थनही दिले.

सरकार कडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता

आम्हाला आमचे म्हणणे सरकारकडे मांडायचे आहे. किमान आमचे ऐकून घेण्यासाठी वेळ तरी द्या, अशी विनंती हे कलावंत करीत होते, पण सरकार कडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जोपर्यंत वेळ मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा कलावंतांनी घेतला होता. त्यामुळे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी तातडीने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि उद्या दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात चर्चेसाठीची वेळ मिळवून दिली.दरम्यान, मराठी कलावंतांची अशी निराशा योग्य नाही, अशा शब्दांत आमदार अॅड आशिष शेलार यांनी खंत व्यक्त केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ‘या’मुळे नकारली

Aprna

सोनिया गांधींच्या दिल्लीतील बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!

News Desk

मोठी बातमी! हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त

News Desk