मुंबई | देशात कोरोनाच्या लाटेचा दुसरा फेरा राज्याच्या डोक्यावर घोंगावत आहे. असं असताना महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी २५,८३३ इतके नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत, तर मुंबईने रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत ३,०६२ इतके नवीन रुग्ण सापडले आहेत. तर देशात काल (२० मार्च) ३५,८७० नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान, देशामधून सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाने राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजपने ट्विट करत म्हटले आहे की, देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय, असं म्हणत ”ठाकरे सरकराची पोरं हुश्शार…”, असा टोला देखील लगावण्यात आला आहे.
देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय. pic.twitter.com/D0h8rlhqNN
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.