HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी, शिवसेनेला मोठा झटका!

नांदेड। जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपने शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे हे माजी आमदार असून त्यांनी या मतदारसंघातून रावसाहेब अंतापूरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे पोहोचले आणि त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुभाष साबणे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं.

अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण तयारी केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ सरकारला झटका दिल्यानंतर आता देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप बाजी मारतं की काँग्रेस आपली जागा राखतं हे पाहवं लागेल.नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ही जागा मिळवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा करत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समीतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. तसंच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्या अंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाला EWSमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत – विनायक मेटे

News Desk

मास्कची किंमत सर्वाधिक कमी करणारे महाराष्ट्र हे ठरले पहिले राज्य!

News Desk

“बजेटचा डोंगर, निघाला उंदीर…”,अर्थसंकल्पावर ‘मविआ’च्या आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Aprna