HW News Marathi
महाराष्ट्र

विधान परिषदेच्या अकोल्याच्या जागेवर भाजपच्या वसंत खंडेलवाल यांचा विजय

मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून भाजपचे वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला. तर नागपूर मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात खंडेलवालांना ४४३ मतांनी विजयी झाला असून त्यांच्याविरोधातील शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मतांनी पराभव झाला आहे. या मतदारसंघात महाविकासआघाडी ८० मते फुटली असून जवळपास ३१ मते अवैध ठरली आहेत. बाजोरियांचा १०९ मतांनी पराभव झाला आहे.

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. बावनकुळेंचा ३६२ मतांनी विजयी झाला आहे. तर बावनकुळे विरोधात मतदानच्या एक दिवस आधीच काँग्रेसने पाठिंबा दिलेले उपक्ष उमेदवार मंगेश देशमुख १८६ मतांनी पराभव झाला तर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना फक्त एक मत मिळाले आहे. नागरपूरमध्ये महाविकसआघाडीचे ४४ मते फुटली आहे.

अकोला-वाशिम-बुलडाणा या तीन जिल्ह्यात २२ मतदान केंद्र असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला होता. विधान परिषदेचे आज (१४ डिसेंबर) गोपिकिशन बाजोरिया यांचा दारुण पराभव तर वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण दडपण्याचा आरोप, डीसीपी कार्यालयावर मोर्चा

News Desk

व्हर्च्युअल कृषी प्रदर्शनात ‘जयंत ॲग्रो २०२१’ ॲपचे अनावरण

News Desk

वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना धमकी देणारा आहे तरी कोण? – सुधीर मुनगंटीवार

News Desk