नवी दिल्ली | कोरोनावर प्रभावीपणे मात करण्यासाठी लसीकरण हे हत्यार आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. असं असलं तरी लस निर्मितीपासून ते लस घेईपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अनेकांनी लस घेण्याचं अद्याप टाळलं आहे.
जगभरातून येणाऱ्या बातम्यांनी नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठल्या होत असल्याच्या अनेक बातम्यांनी नागरिक धास्तावले आहेत. त्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय एईएफआय समितीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण खूपच कमी असल्याचं नमूद केलं आहे.
कोविशील्ड लसीकरणानंतर एकूण ४९८ जणांचा या प्रकरणी अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत रक्ताच्या गुठळ्या झाल्याची २६ प्रकरणं समोर आल्याची सांगण्यात आलं आहे. कोव्हॅक्सिन संदर्भात एकही प्रकरण समितीला आढळून आलं नाही.
कोविशील्ड लस घेतल्यानंतर प्रति दहा लाख प्रकरणात ०.६१ रिपोर्टींग रेट आहे. हेच प्रमाण इंग्लंडमध्ये दहा लाखांवर ४ आणि जर्मनीत दहा लाखांवर १० इतकं आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात २० दिवसात कोणताही त्रास झाल्यास तात्काळ लसीककरण केंद्रावर जाण्यास सांगण्यात आलं आहे.
Bleeding & clotting cases following COVID vaccination in India are minuscule and in line with the expected number of diagnoses of these conditions in the country, a report submitted by the National AEFI Committee to the Ministry of Health & Family Welfare said.
— ANI (@ANI) May 17, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.