मुंबई | देशातील ८ समुद्र किनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’ने गौरवण्यात आले आहे. देशात ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलेल्या किनाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील एकही समुद्र किनारा नाही आहे. याबद्दल युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खंत व्यक्त केली आहे. तर खंत व्यक्त करताना त्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अपेक्षाही व्यक्त केली आहे.
“दुर्दैवानं आपल्या राज्यात ब्लू फ्लॅगचा अभिमान बाळगावा असा एकही समुद्रकाठ नाहीये. जर आवडीनं त्याचा विकास केला गेला, तर महाराष्ट्राच्या ७५० किमी लांबीच्या किनारपट्टीवर पर्यटन व रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. मला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मोठ्या आशा आहेत,” अशी अपेक्षा सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.
Unfortunately we don't have a single beach to boast of #BlueFlagGoldenBeach in our state.
If developed with passion, Maharashtra's 750 kms coastline has huge potential for tourism & employment generation.
I have great hopes from our tourism minister @AUThackeray ji. https://t.co/TNZEk1vch3
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) October 12, 2020
कोणत्या किनाऱ्यांना मिळाला आहे ब्लू फ्लॅग?
शिवराजपूर बीच ( गुजरात), गोल्डन बीच( ओडिसा), घोघाला बीच ( दीव), पादुबिदरी बीच आणि कासरकोड बीच( कर्नाटक), कप्पड बीच( केरळ), रुशिकोंडा बीच( आंध्र प्रदेश) आणि राधानगर बीच ( अंदमान आणि निकोबार).
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.