HW News Marathi
महाराष्ट्र

महापालिका आयुक्तांनी या कारणासाठी मागितली महापौरांची माफी

मुंबई | मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आज (१४ ऑक्टोबर) पार पडणार होत्या. सकाळी १० वाजता ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी महापौर आणि नगरसेवक सकाळी 9.30 पासून हजर होते. पण या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी गैरहजर राहिले. तर चिटणीस विभागातील दोनच कर्मचारी उपस्थित होते. बाकी कर्मचारी गैरहजर होते. तसेच जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तही गैहरजर राहिले. संबंधित वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने महापौर आक्रमक झाल्या. याप्रकरणी महापौरांनी आयुक्तांनी फोनवर उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोपही केला होता.

मात्र, आता मुंबई महापालिकेत प्रभारी निवडणुकीवरुन सुरु झालेला सत्ताधारी विरुद्ध आयुक्त वाद अखेर मिटला आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अखेर महापौर किशोरी पेडणेकर तसेच सभागृह नेत्यांची माफी मागितली आहे. “मला लहान भाऊ समजून माफ करा,” असे इक्बालसिंह चहल यांनी महापौर पेडणेकर यांना सांगितले. याप्रकरणी वाद वाढत असतानाच आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापौर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना फोन केला. मला लहान भाऊ समजून माफ करा, असे चहल महापौरांना म्हणाले. यानंतर महापौरांनीही लहान भावानंही यापुढे मोठ्या बहिणीचं ऐकावं, अस सांगत या वादावर पडदा टाकला आहे.

काय आहे प्रकरण?

कर्मचारी गैरहजर राहिल्याने निवडणुका घ्यायच्या कशा? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. पालिकेचे अधिकारी वेळेचे बंधन पाळत नाही याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावं. यासाठी महापौर किशोरी पेडणेकरांनी ठिय्या आंदोलन केलं. सहाय्यक आयुक्त आणि इतर अधिकारी गैरहजर राहील्यामुळे प्रभाग समितीची निवडणुकीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. हे अधिकारी का गैरहजर राहिले, याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, विरोधकांना याप्रकरणी शिवसेनेला टोला लगावला आहे. मुंबईच्या महापौर किती हतबल आहेत, त्यांना त्यांचेच अधिकारी निवडणुकीसाठी हजर न राहिल्याने आज त्यांच्याच दालनासमोर ठिय्या आंदोलन करावे लागले, हा सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक की त्यांच्या कर्माची फळे, असा सवाल भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा आकडा १८९५, मुंबईत आढळले आणखी १३४ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही; कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये! – मुख्यमंत्री

Aprna

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाच्या वेळवरून शिवप्रेमीमध्ये नाराजी

Aprna