मुंबई | महाराष्ट्रात विशेषत: मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढायला लागली तेव्हा सरकारने बीकेसी येथे जम्बो रुग्णालय उभारण्यास सुरुवात केली. याच रुग्णालयाबाबत काही बातम्या सोशल मीडियामध्ये वायरल होत आहेत. याबाबत भाजपचे नेते नितेश राणे यांनीही ट्विट केले होते. त्यावर आता महापालिकेने खुलासा केला आहे.
मुंबई महापालिकेने ट्विटरवरून रुग्णालयाचे फोटो शेअर करुन खुलासा केला आहे. “निसर्ग चक्रीवादळामुळे बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाला मोठा फटका बसल्याचा दावा करत अफवा पसरवल्या जात आहे. त्या खोट्या आहेत. वादळामुळे रुग्णालयाच्या कुंपनाचे फक्त थोडे नुकसान झाले आहे. रुग्णालय व्यवस्थित असून, सायंकाळपासून पुन्हा सुरू करता येऊ शकते,” असे पालिकेने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १ हजार बेडची सुविधा असलेले जम्बो कोविड रुग्णालय वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) मैदानावर उभारण्यात आले. या रुग्णालयात काही रुग्णही दाखल झाले होते. मात्र, काल (३ जून) मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने तेथील रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले होते. दरम्यान, काल निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीसह इतर काही भागात प्रचंड विध्वंस केला होता. सुदैवानं मुंबईत हे वादळ आले नाही. मात्र, या वादळामुळे बीकेसीतील रुग्णालयाचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात आली होती.
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर बीकेसीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे व्हिडीओ शेअर केले होते. त्याचबरोबर रुग्णालयाचा मोठे नुकसान झालं असून करदात्यांच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी राज्य सरकार केला होता. त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला होता. त्याला प्रत्युत्तर देत पालिकेने हे ट्विट केले आहे.
Rumours claiming that the Jumbo facility set up at BKC has been badly affected by #CycloneNisarga is false. There has only been a minor damage to the fence – the hospital structure is sound and it can be put to operation this evening .#NaToCorona#BMCNisargaUpdates pic.twitter.com/Vyrlhxa2Ta
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 4, 2020
Jumbo isolation centre at BKC goes down the drain in just few hours n so does the taxpayers money which was misused here by Penguin T gang!! pic.twitter.com/SVzCwvpfy3
— nitesh rane (@NiteshNRane) June 3, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.