HW News Marathi
Covid-19

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण

मुंबई | कोरोना काळात लाखो गरजूंना मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. सोनू सूद याने स्वत: ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. सध्या चिंतेचे कोणतेही कारण असून त्याची प्रकृती नीट आहे. त्याचप्रमाणे, तो विलगीकरणात उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना काळात सोनू सूदने लाखो लोकांना मदतीसाठी हात पुढे केला होता. त्यामुळेच, मोठ्या पडद्यावर व्हिलनची भूमिका साकारणारा हा अभिनेता आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांसाठी हिरो ठरला आहे.

आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती अभिनेता सोनू सूद याने स्वतः ट्विट करून दिली. आपल्या ट्विटमध्ये तो लिहितो कि, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे.”

कोरोना महामारीच्या काळात लाखो स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला सोनू सूद धावून गेल्याचे पाहायला मिळाले आहे. या काळात वेळोवेळी त्याने अनेकांची मदत केली. स्थलांतरितांना प्रश्नांपासून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यापर्यंत या काळात त्याने काम केल्याचे देशाने पाहिले आहे. त्याचप्रमाणे, आपण आपले हे काम अविरत सुरु ठेवणार असल्याचेही सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

WHOचा इशारा, पुन्हा आधी सारखे जीवन जगता येणार नाही!

News Desk

“रामदेव बाबांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा”, IMAचं पंतप्रधान मोदींना पत्र

News Desk

ओमायक्रॉनवर मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता; लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk