HW News Marathi
महाराष्ट्र

बॉलिवूड अभिनेत्री ते राजकारण, उर्मिला मातोंडकर यांचा प्रवास…

मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेस पक्षाची वाट सोडत शिवसेनेची वाट धरली आहे. आज (१ डिसेंबर) मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या निवासस्थानी उर्मिला मातोंडकर यांनी शिवबंधन हाती बांधले. उर्मिला मातोंडकर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांत त्यांनी भूमिका केली आहे आणि त्यापैकी काही भूमिका प्रचंड गाजल्या सुद्धा आहेत. ‘झाकोळ’ या मराठी सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर एक एक करत अनेक हिट चित्रपट उर्मिला मातोंडकर यांनी प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणले.

बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर आलेल्या उर्मिला यांनी 80च्या दशकात ‘कलयुग’ सिनेमातून खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या सौदर्यांने आणि उत्तम अभिनयाने त्यांनी बॉलिवूडमध्ये दबदबा निर्माण केला. त्यांचं शालेय शिक्षण मुंबईत तर पदवी शिक्षण पुण्यात झालं आहे. त्यांनी तत्वज्ञान विषयातून बीएची पदवी घेतली आहे. उर्मिला यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हे ग्रीन्डलेज बँकेत काम करत होते. मातोंडकर यांचा मोठा भाऊ केदार इंडियन एअरफोर्समध्ये आहे. त्यांचे वडील ‘राष्ट्रसेवा दला’शी संबंधित होते. त्यांनी आणीबाणीच्या विरोधात भूमिकाही घेतली होती.

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या उर्मिला यांनी 2019मध्ये सक्रिय राजकारणात भाग घेतला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांना अपयश आलं. पण त्यांनी आपल्या राजकीय समज आणि भाषणांनी संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं.उर्मिलाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि पक्षाने उर्मिलाला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी सुद्धा दिली.

मात्र, या निवडणुकीत उर्मिलाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांनी उर्मिलाने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरची यात्रा ‘ही’ सर्वात प्राचीन यात्रा, मोदींच्या हस्ते पालखी मार्गांचे भूमिपूजन

Gauri Tilekar

अब्दुल सत्तार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर दाखल

News Desk

“असा कोणता कोरोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?”

News Desk