HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या हाती शिवबंधन!

मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज (१ डिसेंबर)‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सौ. मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले. पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे.

 

विधान परिषदेत शिवसेनेचा आवाज उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने अधिक बुलंद होणार आहे. अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल चढवला असताना उर्मिला यांनी ठाम भूमिका घेत कंगना सुनावलं होतं. एक वाजता पक्षप्रवेशाची ठरलेली वेळ अचूक पाळून उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या टायमिंगचीही चुणूक दाखवली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणार जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर्स

News Desk

एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ नये या निर्धाराने सुरुवात करु, मुख्यमंत्र्यांचे शिक्षकांना आवाहन

News Desk

मुंबई महापालिका निवडणूकीत ‘बिहार पॅटर्न’ राबवण्याचे आशिष शेलारांनी दिले संकेत

News Desk