HW News Marathi
महाराष्ट्र

कुत्र्याचे मटन खाणाऱ्या दोघांना अटक

म्हापसा : औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी कुत्ता बिर्याणी चर्चेत आली होती., आता गोव्यामध्ये कुत्र्याचे मांस खाणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.मिझोराम येथील मुळ रहिवासी असलेले हे संशयित सध्या कांदोळी भागात वास्तव करुन होते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जेरी लाल्तलांझुवा व लालनीनीया पाझवान या संशयितांना अटक करण्यात आली.

साळगाव येथे दोघा युवकांना कुत्र्याचे मांस नेताना काही लोकांनी पकडले. नंतर त्यांना कळंगुट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कळंगुट परिसरातील काही हॉटेलमध्ये कुत्र्याचे मांस शिजवून त्याची विक्री केली जात असल्याचा व्हिडीयो फेसबूक तसेच वॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर काही दिवसापासून वायरल झालेला. मात्र पकडण्यात आलेल्या दोघांनी कुत्र्याला स्वत: खाण्यासाठी मारल्याची कबुली पोलिसांना दिली. कुत्र्यांना मारुन ते त्यांचे मांस हॉटेलात विकत नसल्याचेही पोलिसांना सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारने शासकीय दिनदर्शिकेतून मराठी महिनेच काढून टाकले, या मागील बोलविते धनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आहेत काय?  

News Desk

“मतदानाची वेळ येईल तेव्हा लोक भाजपच्या….”, जयंत पाटील म्हणाले….

News Desk

एस टी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरून पंकजा मुंडेंची खंत!

News Desk