HW News Marathi
महाराष्ट्र

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. राज्यपालांच्या भाषणाची प्रत विरोधकांना मिळाली नाही. आणि इअरफोनमधून मराठी भाषातंर बंद झाले, त्यामुळे विरोधकांनी सभा त्याग केली.

विरोधकांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला. धर्मा पाटील यांची मंत्रालयातील आत्महत्या, गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, वाढती बेरोजगारी आणि फसवी गुंतवणुकीची आकडेवरी, कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या सर्व मुद्द्वर सरकारला घेरण्याचे संकेत विरोधकांनी यावेळी दिले.

विरोधकांनी दिलेल्या संकेताप्रमाणे पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. यावर विरोधी नेता धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन सरकारवर टीका केली.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी विखे—ाटील यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषधेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष संजय तटकरे आदी दिग्गज मंडळी उपस्थित होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांबाबतचे वक्तव्य नारायण राणे यांना नाशिकव्यतिरिक्त अंतरिम दिलासा नाही!

News Desk

जनधन खातेदारांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून रूपै एटीएम कार्डचे 8 मे पासून वितरण

News Desk

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ?

News Desk