HW News Marathi
महाराष्ट्र

‘मेरे पुतले जला लो तुम ये शोला कम नहीं होगा’; भाजपच्या आंदोलनावर मलिकांचे शायरीतून प्रत्युत्तर

मुंबई। अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीसांना पाठिंबा देण्यासाठी नवाब मलिकांच्या विरोधात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मंत्रालया बाहेर जोरदार आंदोलन करत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मलिकांचा पुतळा जाळला. या अनुषंगाने नवाब मलिकांनी ट्वीटद्वारे शायरी शेअर करून भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘मैं सच्चाई पे हूँ और सच का जज़्बा कम नहीं होगा, मेरे पुतले जला लो तुम ये शोला कम नहीं होगा।’

यापूर्वीच्या ट्वीटमध्येही मलिकांनी एक शायरी शेअर केली होती. ते म्हणाले, ‘होश उनके यूँ उड़े कि चेहरे फीके पड़ गए, हमने तो बस ये किया उन्हें आईना दिखा दिया!’

मलिकांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन

काल 10 नोव्हेंबर पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. गुन्हेगारांना अभय दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर मलिकांनी केला. तसेच फडणवीस यांनी बनावट नोटांचे प्रकरण दाबल्याचा आरोप देखील मलिकांनी यावेळी केला. यामुळे राज्यातील ठिकठिकाणी मलिकांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी थेट मंत्रालयाला धडक दिली. यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामुळे मंत्रालय परिसरात वातावरण तापले होते. यादरम्यान पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

Aprna

रान डुक्कराचा घरात घुसून महिलेवर हल्ला

News Desk

‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना मोठया प्रमाणात राबवा – मुख्यमंत्री

News Desk