HW News Marathi
देश / विदेश

नवे मंत्री आज आपल्या पदाचा कारभार हाती घेणार; पंतप्रधानांनी बोलावली बैठक

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल (७ जुलै) पार पडला. सायंकाळी ६ वाजता निवडलेल्या ४३ मंत्र्यानी शपथ घेतली. सर्व नवे मंत्री आज आपल्या पदभार सांभाळणार आहेत.नव्या मंत्रिमंडळासोबत होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेत मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मंत्रिपरिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. ज्यामध्ये कॅबिनेट, स्वतंत्र प्रभार आणि राज्यमंत्री सहभागी होती. काउंसिल ऑफ मिनिस्टर्सच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं व्हिजन जाहीर करणार आहेत.

मोदी सरकारची दुसरी इंनिंग सुरु

नवीन मंत्रिमंळाने काल (८ जुलै) गोपनीयतेची शपथ घेतली. पंतप्रधान म्हणून मे २०१९ मध्ये ५७ मंत्र्यांसह आपला दुसरा कार्यकाळ सुरु केल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपरिषदेत फेरबदल आणि विस्तार केला आहे. या फेरबदल आणि विस्तारापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता.

महाविकासआघाडीकडून टीका

मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राजिक्य वातावरणामध्ये अनेक खळबळ माजली आहे. महाविकासघडीकडून ट्विट द्वारे टीका केली जात आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत, ‘बिघडलंय तर इंजिन पण बदलले डबे, व्वा मोदीजी व्वा!’ असं ट्विट केलं आहे.

‘राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे आणि नव्याने मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नाव वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल’. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही मोदींच्या मंत्रीमंडळात निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना संधी दिल्याबद्दल निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळच्या मदतीसाठी यूएईचा हात

swarit

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच ‘हे’ सगळं सुरु, नवनीत राणांचा गंभीर आरोप 

News Desk

केरळमध्ये RSS च्या कार्यालयावर अज्ञातांनी बॉम्ब फेकला

Aprna