HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

कार नाल्यात कोसळून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण, मेव्हण्याचा मृत्यु

बीड |  चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण व मेव्हण्यांचा मृत्यु झाला. कल्याण – विशाखापट्टणम महामार्गावर शिरुर तालुक्यातील मातोरी परिसरात बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला.ममता तगडपल्लेवार (वय ५०) व विलास तगडपल्लेवार (वय ६२, रा. पुसद, जि़ यवतमाळ) अशी मृत्यु पावलेल्या पतीपत्नींची नावे आहेत.

तगडपल्लेवार पतीपत्नी हे कारने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी अहमदनगरच्या दिशेने जात होते. कल्याण -विशाखापट्टणम महामार्गावर मातोरी परिसरामध्ये कारवरील ताबा सुटल्याने कार नाल्यात जाऊन कोसळली. अपघातात कारचा अक्षरश चुराडा झाला. त्यात विलास तगडपल्लेवार हे जागीच ठार झाले. त्यांच्या पत्नी ममता तगडपल्लेवार यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.

Related posts

आजचा कृषिदिन हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस – संजय राऊत

News Desk

राफेल करारासाठी रिलायन्सची निवड आम्हीच केली होती !

Gauri Tilekar

शेतकऱ्यांसाठी राबविली जाणार १ लाख सौर कृषी पंप योजना

Gauri Tilekar