औरंगाबाद | औरंगाबादमधील गंगापूर तालुक्याचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्र वापरून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा आरोप प्रशांत बंब यांच्यावर लावण्यात आला आहे. प्रशांत बंब यांना अटक झालेली नाही, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्याज वाटण्याच्या नावाखाली अधिकची दिली जाणारी रक्कम अपहार करण्यासाठी बेकायदेशीररित्या वापरल्याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गंगापूर सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. राज्य सरकारने या कारखान्यावरील कर्जापोटी हा कारखाना जप्त देखील केलेला आहे. तर, संबंधित बँकेने हा कारखाना विक्रीस काढल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयीन कारवाईत गंगापूर न्यायालयात कारखान्याकडून रक्कम जमा करण्यात आली होती. त्यांनतर हा विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाकडून ही रक्कम कारखान्याच्या खात्यात जमा झाली होती. ती आतापर्यंत व्याजासह १५ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम १५ कोटी ७५ लाख होती. पण खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते.
पण त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात १४ सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे.यामुळे आता प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून प्रशांब बंब यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर कारयदेशीर कारवाई करू असंही सभासदांकडून म्हणण्यात आलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.