मुंबई | रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात धक्का बसला आहे. रिपब्लिक विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात असून, याविरोधात गोस्वामी यांच्या रिपब्लिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जाण्यास मूभा देण्यात आली आहे.
#SupremeCourt bench led by Justice DY Chandrachud to shortly hear a plea seeking protection against the entire @republic @Republic_Bharat channel under ARG Outlier from coercive action by @MumbaiPolice
Plea was filed after FIR was registered against the entire editorial staff pic.twitter.com/EOj7oKbrEv
— Bar & Bench (@barandbench) December 7, 2020
न्यायालय काय म्हणाले?
“ही याचिका महत्त्वाकांक्षी असल्याचं दिसत आहे. आपली इच्छा आहे की, महाराष्ट्र पोलिसांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये. त्याचबरोबर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावं. यात हेच चांगले होईल की, आपण ही याचिका मागे घ्यावी,” असं न्यायालयानं सुनावलं. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली.दाद मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात जाण्याची परवानगी देत न्यायालयानं याचिका मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर गोस्वामी यांचे वकील मिलिंद साठे यांनी याचिका मागे घेतली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.