HW News Marathi
महाराष्ट्र

“येणाऱ्या 4 दिवसांत 4 ठिकाणी राज्याच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर येणार”, किरीट सोमय्यांचा नवा दावा

मुंबई। भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातल्या नेतेमंडळींचे घोटाळे काढण्यात व्यस्त आहेत. रोज नवनवीन घोटाळे किरीट सोमय्या हे बाहेर काढत असताना याच माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सुरू असतात. आणि अशातच आता पुन्हा एकदा किरिट सोमय्या यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापवल आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामांची चौकशी होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळं पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप मालिका आता राज्यात पाहायला मिळणार आहे.

अजित पवार यांचे मामा आणि बिझनेस पार्टनर यांचीही चौकशी होणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडी आणि सीबीआय या सगळ्या कारवायांनी राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली होती. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जणू वैर असल्याचे चित्र त्यामुळं समोर येतंय. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्यांनी रविवारी अनेक दावे करून, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आपली तोफ सत्ताधाऱ्यांवर डागली आहे. सोमय्या म्हणाले की, येणाऱ्या 4 दिवसांत 4 ठिकाणी राज्याच्या नेत्यांची प्रकरणं बाहेर येणार आहेत. या ठिकाणी ईडी कारवाया करेल. तपास यंत्रणा कारवाई करतील. त्यात अजित पवार यांचे मामा आणि बिझनेस पार्टनर यांचीही चौकशी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टोकाची टीका

यावेळी किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री असलेले नवाब मलिक देखील होते. ते म्हणाले, नवाब मलिकांना आत्ता जाग आली का ? वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यांचा सगळा तपास पूर्ण होणार आहे. येत्या दोन ते चार दिवसांत अजित पवारांच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्यांच्या चौकशा होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

राज्यातल्या हिंसाचारावरही सोमय्यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले, शिवसेनेचा नेता नांदेडमध्ये भाषण करतो. रझा अकादमीच्या एकाही नेत्याची अटक का नाही ? जे मोर्चे निघाले ते काय आरएसएसनं काढले ? हिंदू हा मुद्दा यांच्यासाठी राहिला नाही. छत्रपतींचा महाराष्ट्र हे मान्य करणार नाही. हिंदूंची दुकाने तोडली आणि जाळली. मात्र, हे संजय राऊतांना दिसत नाही. असं म्हणत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टोकाची टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू, ७ जखमी

News Desk

चंद्रकांतदादाच सोमय्यांचे मास्टरमाइंड, सोमय्यांवर 150 कोटींचा मुश्रीफ दावा करणार!

News Desk

हसन मुश्रीफ सोडणार अहमदनगरचं पालकमंत्री पद?

News Desk