HW News Marathi
महाराष्ट्र

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपीला CBI ने केली अटक

नरेंद्र दाभोलकऱ्यांच्या हत्येनंतर ५ वर्षांनी मुख्य संशयित आरोपीला CBI ने अटक केली आहे. औरंगाबाद येथून सचिन प्रकाशराव अंदुरे याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी HW मराठीला दिली. CBI च्या मते अंदुरे हा २० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकरांवर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींपैकी एक संशयित आरोपी आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांवर ताशेरे ओढल्यानंतर दोनच दिवसात ही अटक करण्यात आली आहे. ह्याच महिन्यात सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती म्हणाले की, “या देशात सध्या अस्थिरतेचे वातावरण असून एखादी सर्वसामान्य व्यक्ती स्पष्टपणे बोलू शकत नाही किंवा मुक्तपणे वावरू शकत नाही. त्याचे कसलेही सोयरसुतक नसल्याप्रमाणे तपास यंत्रणा मात्र सुस्तपणा दाखवत आहेत.” डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या तपासादरम्यान सीबीआय आणि ‘विशेष तपास पथक’ दाखवत असलेल्या निष्क्रियतेवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मागच्या पाच वर्षांपासून तपास सुरु आहे. सचिन अणदुरेच्या अटकेने या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३६४८, तर आत्तापर्यंत ३६५ रुग्णांची कोरोनावर मात

News Desk

जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार; कंत्राटदारांवर 4 हजार कोटींची खैरात : धनंजय मुंडे

News Desk

पेट्रोल २ रूपयांनी तर डिझेल १ रूपयांनी होणार स्वस्त

News Desk