HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला धक्का ,अनिल देशमुखांच्या मुंबईसह १० ठिकाणी CBI चे छापे !

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या इतर मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे. अनिल देशमुखांच्या मुंबईसह १० ठिकाणी CBI ने छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील १० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत.

१० ठिकाणी CBI चे छापे

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला.

सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’च्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर रेडीरेकनर दर जाहीर होणार !

swarit

गोपीनाथ मुंडेंच्या संस्थेकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष

News Desk

लम्पीबाधित पशुधनापैकी एकूण २९ हजार ४१० पशुधन उपचाराने झाले बरे

Aprna