नवी दिल्ली | परीक्षा तर झाल्या मात्र निकाल कधी लागणार याची सगळे विद्यार्थी, पालक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर झाला आणि आज सीबीएसई १०वीचा निकाल जाहीर करण्यात आला. एकूण निकाल हा ९१.४६% इतका लागला आहे. तर महाराष्ट्रातील पुणे विभाग चौथ्या क्रमांकावर आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारलेली दिसत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा ३.१७% चांगला निकाल लागला आहे.
सीबीएसई १०वीच्या निकालात यंदा ९३.३१% टक्के मुली पास झाल्या आहेत. तर ९०.१४% टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. आणि ७८.९५% टक्के ट्रांसजेंडर विद्यार्थ्यांनी देखील यश संपादन केले आहे. तर, महाराष्ट्रात ९८.०५ % विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, आज दहावीचे जे निकाल जाहीर करण्यात आली ते बेस्ट ऑफ थ्री ने करण्यात आले. तीन पेक्षा जास्त विषयांच्या परीक्षा दिल्या आहेत, त्या विषयातील सरासरी गुण अन्य न झालेल्या विषयांनाही मिळणार आहेत.
Central Board of Secondary Education (CBSE) Class 10 exam results announced. Overall Pass Percentage is 91.46% pic.twitter.com/NYi63iBY85
— ANI (@ANI) July 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.