HW News Marathi
महाराष्ट्र

CBSE १२ वीचा आज निकाल, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहायचा

नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने आज (३० जुलै) दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा केलीय. निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करावेत असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात सीबीएसईने एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती. ज्यामध्ये याच आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलेलं. यावर्षी करोना महामारीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, निकालांसाठी मंडळाने नवीन मुल्यांकन पद्धत वापरली आहे. तसेच अहवालानुसार सीबीएसई यंदा कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही.

मुल्यांकनासंदर्भातील १३ सदस्यीय समीतीने मूल्यमापनाचा आराखडा, त्यासाठीचे नियोजन यापूर्वीच जाहीर केलं होतं. या नुसार १२ वीचा निकाल जाहीर करताना त्यामध्ये १० वीच्या गुणांचाही विचार करण्यात येणार आहे. दहावीच्या गुणांना ३० टक्क्यांपर्यंत महत्व या निकाला दिलं जाणार आहे. तसेच ११ वीच्या निकालाचं महत्व ३० टक्के आणि १२ वीमधील कमागिरीसाठी ४० टक्क्यांपैकी गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये चाचणी परीक्षा, प्री बोर्ड एक्झामच्या गुणांचा विचार केला जाईल असं सांगण्यात आलं आहे.

सीबीएसईने १० वी आणि १२ वीला बाहेर बसलेल्यांची परीक्षा ऑगस्ट १६ ते सप्टेंबर १५ दरम्यान घेतली जाणार असल्याचं सांगितले आहे. नवीन मुल्यांकन पद्धतीने या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करता येणार नसल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे. हे विद्यार्थी सीबीएईच्या शाळांमधीलच आहेत असं नसून आधीच्या गुणांचा आधार यांचा निकाल लावताना घेता येणार नाही असं बोर्डाने म्हटलं आहे. विद्यार्थी त्यांचे संबंधित निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात cbse.nic.in वर पाहू शकतात. विद्यार्थ्यांना डिजीलॉकर सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांचे निकाल पाहता येतील.

या वेबसाइटवर पाहता येतील निकाल

cbse.nic.in , cbseacademic.nic.in , digilocker.gov.in

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचा कोणता प्रश्न सरकारने सोडवला? नारायण राणेंचा मराठा आरक्षणावरून ठाकरेंना टोला

News Desk

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

News Desk

मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला लाज वाटायला हवी, कंगनाचे उद्धव ठाकरेंवर शरसंधान

News Desk