नवी दिल्ली | सीबीएसईच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांचा १३ जुलैला निकाल नुकताच जाहीर झाला होता. आणि आज (१५ जुलै) सीबीएसईच्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीच्या निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. cbse.nic.in , cbseresults.nic.in आणि results.nic.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दहावीच्या निकालाबाबत ट्विट करत माहिती दिली.
“माझे प्रिय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
My dear Children, Parents, and Teachers, the results of class X CBSE board examinations will be announced tomorrow. I wish all the students best of luck.👍#StayCalm #StaySafe@cbseindia29
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) July 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.