मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीव सीबीएसई म्हणजेच सेकंडरी बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने १ ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहना यांनी ही माहिती आज (२५ जून) सर्वोच्च न्यायालयात दिली. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्यास महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू या राज्य सरकारांनी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती. सीबीएसईप्रमाणेच आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
CBSE decides to cancel 10th and 12th exams scheduled for July 1 to 15, Solicitor General Tushar Mehta informs Supreme Court. #COVID19 pic.twitter.com/5XjLQWtJpV
— ANI (@ANI) June 25, 2020
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरून आज सर्वोच्च न्यालायलात सुनावणी सुरू होती. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, “महाराष्ट्र, दिल्ली आणि ओदिशा या राज्यांनी सध्याची कोरोनाची परिस्थितीत पाहाता परीक्षा घेण्याबाबत या राज्यातीनी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या १ ते १५ जुलैदरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावीच्या परीक्षा पूर्णपणे रद्द तर बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे लागणारा निकाल मान्य नसेल तर पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.”
Solicitor General (SG) Tushar Mehta says, as soon as conditions will be conducive, we could conduct the CBSE class 12 examinations for students who opt for it. https://t.co/N254IhgKWr
— ANI (@ANI) June 25, 2020
सीबीएसईप्रमाणेच आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तसेच आयसीएसईने दहावी आणि बारावीच्या उर्वरीत विषयाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन मागील तीन परीक्षांमधील गुणवत्तेवर होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.