HW News Marathi
Covid-19

केंद्राने आता छत्तीसगडच्या धर्तीवर टेस्टिंग कीट्सची खरेदी करावी !

मुंबई | “टेस्टिंग किटसाठी पेमेंट केले नसले तरी खरेदी,वितरण,त्यातील दोष कळण्यात व ते परत करण्यात मौल्यवान वेळ गेला. चाचण्यांना झालेल्या दिरंगाईने देशाने आधीच जबर किंमत चुकवलीय. त्यामुळे अधिक विलंब न लावता मोदी सरकारने छत्तीसगडच्या धर्तीवर टेस्टिंग किटची खरेदी करता येईल का,याचा विचार करावा”, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार यांनी मोदी सरकारला दिला आहे. आयसीएमआरच्या अहवालानंतर केंद्र सरकारने चीनसह अन्य देशांमधून आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अँटीबॉडी टेस्ट किट परत पाठण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी केंद्राला हा सल्ला देत सुनावले देखील आहे.

भारताने चीनकडून ५ लाख अँटीबॉडी टेस्टिंग किट मागवल्या होत्या. मात्र, विविध राज्यांकडून या किट्सबद्दल तक्रारी यायला सुरुवात झाली. या किट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याचे लक्षात आल्यानंतर आयसीएमआरच्या अहवालानंतर आता चीनसह अन्य देशांमधून आलेल्या निकृष्ट दर्जाच्या अँटीबॉडी टेस्ट किट परत पाठण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. मात्र, यामुळे अत्यंत महत्त्वाचा वेळ वाया गेला. या काळात चाचण्यांमध्ये झालेल्या अनियमिततेमुळे देशाने याची मोठी किंमत चुकवली आहे. त्यामुळे आता केंद्राने छत्तीसगडच्या धर्तीवर टेस्टिंग किटची खरेदी करण्याचा विचार करावा, असे रोहित पवार यांनी सुचवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझा मोबाईल माझी जबाबदारी” मनसेने महापौरांना पुन्हा डिवचले

News Desk

Sputnik V लसीची पहिली बॅच भारतात दाखल!

News Desk

रशियन राष्ट्राध्यक्षांनी मुलीवर चाचणी करत COVID-19 च्या लशीची केली नोंद!

News Desk