HW News Marathi
Covid-19

कोरोना लसीकारणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा-राजेश टोपे

जालना | कोरोना लसीकरणासाठी लागणार खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडे केल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शिवाय एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरनाला मान्यता द्यावी अशी मागणी देखील केंद्रीय आरोग्यममंत्र्यांकडे केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरणासाठीचा कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्राने द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, पहिल्या टप्यातील लसीकरनाच्या पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. आज (८ जानेवारी) राज्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होत आहे.

राज्यात चार जिल्हे वगळून ड्राय रन होणार असून शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य विभाग पोलीस प्रशासन याच्या समन्वयाच्या त्रुटी समजून येतील शिवाय को विन अँप संदर्भातील तपासणी देखील यावेळी होईल ज्यातून प्रत्यक्ष लसीकरणावेळेस कुठला अडथळा येणार नाही याची काळजी घेण्यास मदत होणार आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

क्षेत्रीय स्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर आणि उपयोगी आहे हे तपासणे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे. या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे. लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढवणे यासाठी ड्राय रन घेतला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ३१ मेपर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता

News Desk

राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तर मुंबईतील ३७४ जणांना डिस्चार्ज | राजेश टोपे

News Desk

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

News Desk