HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्णांवर ‘बीसीजी लसी’ची चाचणी करण्यास परवानगी, पुण्यातील ससून रुग्णालयात होणार चाचणी

मुंबई | जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ४० लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर आतापर्यंत २ लाख ७० हजार जणांचा मृत्यू झालाआहे. जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र, भारतात पहिली बीसीजी (BCG) लसीच्या चाचणीला केंद्र सरकारने परवानगी मिळली आहे. या बीसीजी लसीच्या पहिली चाचणी पुण्यातील ससून रुग्णालयात होणार आहे. ही चाचणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असणार आहे.

बीसीजी लस कोरोनाच्या उपचारात काय भूमिका घेते याचे संशोधन हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे. या संशोधनाचा एक भाग म्हणून पुण्याती ससून रुग्णालयाला लसीची चाचणी करण्याची परवानी मिळाली आहे. पुढच्या आठवड्यात कोरोना रुग्णांवर बीसीची लसीची चाचणी करण्यात येण्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाची सोम्य रुग्णा असतील त्यांच्यावर या लसीची चाचणी करण्यात येणार आहे. यानंतर रुग्णांवर लक्ष ठेवले जाईल. हा रुग्ण कशा प्रकारे लसीला प्रतिसाद देत आहे. याकडे लक्ष दिले जाणार आहे.

दरम्यान, देशात कोरोना बाधितांचा आकडा ५९ हजार ६६२ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत १७ हजार ८४७ लोके कोरोनामुक्त होऊन घरी देखील गेले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. १९०६३ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत तर ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामागोमाग गुजरातमध्ये ७४०२ रुग्ण आढळले आहेत तर ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…नमस्कार, मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय !

News Desk

राज ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रातून ‘ही’ मागणी

News Desk

यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही !

News Desk