HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंना आता केंद्राकडून थेट Y दर्जाची सुरक्षा

मुंबई | ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी भाजपच्या काही नेत्यांची सुरक्षा कमी केली होती. त्यात भाजप नेते नारायण राणे यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली होती. आता नारायण राणेंना केंद्राने Y दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने राणेंना Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

राज्य सरकारकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा दिली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या नव्या निर्णयानुसार ही सुरक्षा रद्द करण्यात आली होती. ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

नारायण राणे यांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने ही सुरक्षा दिली आहे. या सुरक्षेव्यवस्थेनुसार १२ सी. आय. एस. एफचे जवान राणेंच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असणार आहे. महाराष्ट्र सरकारनं भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर आता थेट केंद्राकडून सुरक्षा दिली गेली आहे. येत्या काळात भाजपच्या इतरही नेत्यांना सुरक्षा देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

वाय (Y) प्रकारची सुरक्षा व्यवस्था

तिसऱ्या क्रमांकाची ही सुरक्षा व्यवस्था आहे. महत्त्वाचे असणारे मात्र तुलनेने कमी धोका असेलेल्या व्यक्तींना वाय श्रेणीची सुरक्षा दिली जाते. या व्यवस्थेत एकूम 11 सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये दोन प्रशिक्षित जवान असतात.

कोणत्या त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल

> विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने कमी केली होती.

> फडणवीसची सुरक्षा झेड + होती ती आता वाय + केली होती.

> अमृता फडणवीस यांची सुरक्षा अगोदर वाय + ती आता एक्स केली.

> देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात यानंतर बुलेटप्रूफ कार नाही.

> राज ठाकरे यांच्याकडे पूर्वी झेड सुरक्षा होती. जी आता Y + करण्यात आली.

> रामदास आठवलेंची वाय + सुरक्षा आत्ता विना एस्कॉर्टशिवाय असेल.

> भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे वाय + सुरक्षा होती जी आता रद्द करण्यात आली होती.

> भाजप नेते आशिष शेलार यांना वाय + सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये रूपांतर करून एकलहरे औष्णिक केंद्राचा कायापालट करा! – नितीन राऊत

News Desk

माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करु नका; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर परखड टीका

News Desk

गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवा! – एकनाथ खडसे

Aprna