HW Marathi
महाराष्ट्र

देशातील शेतकऱ्यांना संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव – राजू शेट्टी

GST विरोधात राजू शेट्टी देशव्यापी आंदोलन छेडणार 

  कोल्हापूर – मूठभर उद्योजकांसाठी देशातील शेतकऱ्यांना संपवून टाकण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे असा आरोप करत शेतकऱ्यांना मारक ठरलेल्या जीएसटी विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. हे आंदोलन देशव्यापी असणार आहे.

  केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरणे राबवीत आहेत.  त्यात जीएसटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.  शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी ट्रॉली खरेदीवर 28 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. मात्र  आलिशान मर्सिडीज कारवर फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. ही बाब म्हणजे  मूठभर उद्योजकांसाठी देशातील शेतकऱ्यांना संपवण्याचे केंद्र सरकारचे निश्चित धोरण आहे असा आरोप शेट्टी यांनी केला.  त्यामुळेच आत शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या जीएसटी विरोधात देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यां विरोधात सरकार वारंवार भूमिका घेत असल्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएमधून या पूर्वी बाहेर पडली आहे. आता ते सरकार विरोधात अधिक आक्रमक होणार आहेत. त्यामुळे जीएसटी विरोधात ते रस्त्यावर उतरत आहेत.

Related posts

दिलासादायक : कल्याण-डोंबिवलीत एका दिवसात ५१ जण कोरोनामुक्त

News Desk

मराठा आरक्षणावरची पुढची सुनावणी आता थेट १ सप्टेंबरला होणार

News Desk

राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर, तीन दिवस सुरु रहाणार संप

News Desk