HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जारी!

नवी दिल्ली | देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणानंतरही सरकार सतत जनतेला कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करण्याचं आवाहन करत आहे. अशातच सध्या देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट दिसत असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी कोविड-19 संदर्भात एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईन्समध्ये काही निर्बंधांवर सूट देण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात एक ट्वीट केलं. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “#COVID19 च्या विरोधात लढाई आणखी मजबूत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही निर्बंध आणि खबरदारीचे उपाय जारी केले आहेत. या गाईडलाईन्स 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू राहतील”

काय आहेत नव्या गाईडलाईन्स?

मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.

चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, या नव्या गाईडलाईनमध्ये 50 टक्क्यांहून अधिक

क्षमतेनं चित्रपटगृह सुरु ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे.

चित्रपटगृहांसाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालय लवकरच वेगळ्या गाईडलाईन्स जारी करणार आहे.

स्विमिंग पूल सर्वांसाठी खुले करणात आले आहेत. याआधी स्विमिंग पूल केवळ खेळाडूंसाठी खुले करण्यात आले होते.

नव्या गाईडलाईन्समध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करण्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसणार आहेत. ये-जा करण्यासाठी

कोणत्याही परवानगीची गरज भासणार नाही.

कन्टेन्मेंट झोन सोडून इतर ठिकाणी सामाजिक, धार्मिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, यासाठी गाईडलाईन्सचं पालन करणं आणि परवानगी घेणं आवश्यक असणार आहे.

65 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षांहून कमी वयाच्या मुलांना सर्व उपयायोजनांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीमांचल एक्स्प्रेसचे ९ डबे घसरून भीषण अपघात

News Desk

BCCI ने भारतीय खेळाडुंचे तब्बल १० महिन्यांचे मानधन थकवले

News Desk

“सीबीआय, ईडीच्या तलवारी उपसून भय निर्माण करणारे केंद्र अशा वेळी पळपुटेपणा दाखवते”

News Desk