HW News Marathi
महाराष्ट्र

झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर बेलसरमध्ये केंद्रीय पथकाची पाहणी!

पुणे। जिल्ह्यातल्या बेलसरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाकडून आज (5 ऑगस्ट) या गावाची पाहणी करण्यात आली. तसेच प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा या पथकाने आढावा घेतला. हे पथक बेलसर गावाचा पाहणी अहवाल केंद्राकडे पाठवणार आहे. या पाहणी अवहवालावर केंद्र सरकार अभ्यास करणार आहे.

आढावा घेण्यासाठी राज्यात केंद्रीय पथक दाखल

मागिल महिन्याच्या 30 जुलै रोजी राज्यात पहिल्यांदा झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्यासह जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन या गावात तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यात केंद्रीय पथक दाखल झाले आहे. त्यांनी दोन दिवस जिल्हा प्रशासनाशी बैठकांचे सत्र केल्यानंतर आज बेलसर गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. याशिवाय घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच ग्रामस्थांनी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा, या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

News Desk

महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत काय चर्चा झाली?

News Desk