HW News Marathi
देश / विदेश

अकरावी CET साठी सरकारला हायकोर्टकडून विचारणा!

नवी दिल्ली | राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी CETची परीक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने दिला. अकरावी प्रवेशाच्या निमित्ताने हायकोर्टाने राज्य सरकारला काही प्रश्न केले आहेत. अकरावी प्रवेशाच्या CET च्या निमित्ताने तिन्ही मुख्य बोर्डाच्या अधिकाऱ्यांची एक समिती बनवता येईल का ? जी समिती सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका तयार करू शकेल ? अशी विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारला केली आहे.

सीईटी अर्जासाठीची मुदत ३१ जुलैपर्यंत

दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत ही परीक्षा असणार आहे, तर सीबीएससी आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे काय ? असा सवाल कोर्टाने केला आहे. महत्वाचे म्हणजे सीईटीचा अभ्यासक्रम तयार होणार नसेल तर काही अटी शिथिल करणार का असा सवाल कोर्टाने केला आहे. त्यासोबतच ICSC, CBSC च्या बोर्डाच्या विद्यार्थांच्या अकरावी प्रवेशाचे काय असा सवालही कोर्टाने केला आहे. राज्य सरकारने सीईटी अर्जासाठीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवलेली आहे.

काय आहे प्रकरण?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं घेतला असला तरी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन नेमकं कसं करणार? असा सवाल विद्यार्थी आणि पालकांसमोर उपस्थित झाला होता. अखेर आज (२८ मे) राज्याच्या शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी १० वीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्यूला जाहीर केला आहे. यासोबतच इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामायिक परीक्षा (सीईटी) होणार असल्याचंही जाहीर केलं आहे.

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागणार आहे. विविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता १० वी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्ग मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षे घेण्यात येणार आहे. CET परीक्षेत १० वीच्या अभ्यासक्रमाच्या आधारेच घेण्यात येणार आहे. परीक्षा १०० गुणांची असणार असून त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत व ओएमआर पद्धतीनं दोन तासांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेच्या मदतीने दिल्लीतून दहशतवादी अटकेत

News Desk

गोरक्षकांच्या हिंसेवरून संसदेत गदारोळ

News Desk

महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता गाजवू इच्छिते- सामना

News Desk