HW News Marathi
Covid-19

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची घेतली भेट..

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेत विभागाच्या कामाची संपूर्ण माहिती दिली.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेल्या उपाययोजना आणि केसरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळावे याबाबत घेतलेले निर्णय याची संपूर्ण माहिती छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना दिली.

राज्यसरकार कोरोनाशी लढताना जनतेसाठी वेगवेगळे निर्णय घेत आहे. त्या निर्णयावर तातडीने अंमलबजावणी होते की नाही यावर सरकारचे मंत्री कटाक्ष टाकून आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आपापल्या खात्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देताना दिसत आहेत. आज त्याच अनुषंगाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या खात्याकडून कोरोना संदर्भात जनतेला कशा प्रकारे मदत केली जात आहे याची माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजारांच्या पुढे नवे रुग्ण आढळले

News Desk

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब कोरोना पॉझिटीव्ह 

News Desk

मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत आहेत,दोन्ही समाजाला भडकवण्याचे हे राजकारण बंद करावे 

News Desk