HW News Marathi
महाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छगन भुजबळ यांना आश्वासन

मुंबई | महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले आहे. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई यांनी स्वतः शिक्षण घेऊन महिलांना शिकवण्याचे काम केले. स्रियांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांनी केली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जन्मदिन ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन स्वीकारतानाच ही मागणी मान्य केली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतानाच छगन भुजबळ म्हणाले की, स्रियांना ‘चूल आणि मूल’ या परंपरेतील चार भिंतीच्या पलीकडे आणण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. त्या काळात सामाजिक बहिष्कार स्वीकारून प्रसंगी शेण व दगडधोंड्यांचा मार सहन करत त्यांनी मुलींना शिकवण्याचे ऐतिहासिक कार्य केले त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा देशभरात ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्यासाठी महाराष्ट्र शासन आता केंद्र शासनाकडे याबाबत मागणी करणार आहे.

राज्यातील मागासलेल्या दुबळ्या बलुतेदार, आलुतेदार असलेल्या या सर्व कष्टकरी जातीच्या आरक्षणाला बाधा येऊ न देण्याची शासनाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात केलेल्या ओबीसींची न्याय बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांची यांची नेमणूक करण्यासाठी ही विनंती करत असल्याचे श्री भुजबळ यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी देखील तात्काळ मान्य देखील केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन!

News Desk

रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल

News Desk

मोहम्मद पैगंबरांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश सर्वांनी आचरणात आणून मानवतेच्या कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाऊया 

News Desk