HW News Marathi
महाराष्ट्र

छगन भुजबळ पार्थ पवारांविषयी म्हणतात ..”नया है वह”

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत नाही,तो अपरिपक्व आहे, असे म्हणत पार्थ पवारांना फटकारले . या मुद्यावर आता प्रतिक्रीया यायला सुरूवात झालीये.अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी “आता पवार म्हणाले मग आम्ही काय बोलणार?”, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.

“ हिंदीमध्ये कसं सांगतात नया है वह, तसं. बाकी कुटुंबात सगळं चांगलं आहे.आम्ही सुद्धा त्या कुटुंबाचे सभासद आहोत आणि अजितदादा पण दुखावले गेले नाहीत, कोणचं दुखावले गेले नाही आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि कुटुंबामध्ये एकमेकांचा बोलण्याचे, सुचवण्याचे काम ,त्यांना समजवण्याचे काम वरिष्ठ करत असतात, असे छगन भुजबळ म्हणाले.

तसेच, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येता प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव येत आहे त्याबद्दल भुजबळांना प्रश्न विचारला असता , ‘आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही. उगीच वेगळ्या मार्गावर मीडियात याचा प्रचार होत आहे, असे मत त्यांनी मांडले’. दरम्यान, पद्म समितीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नियुक्त करण्यात आली आहे यावरुन विरोधी पक्ष आक्षेप घेत आहे, याविषयी ‘आदित्य ठाकरेंना समितीवर घ्यायच की नाही हे मुख्यमंत्री पाहतील, असे भुजबळ म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अजित पवार नाराज आहेत का ?’ धनंजय मुंडे म्हणतात…!

News Desk

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं संकट; पुण्यासह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

News Desk

परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण? भाजपचा सवाल!

News Desk