मुंबई | २६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. या घटनेला आज १२ वर्ष पूर्ण झाली असली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात आजही त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या हल्ल्यात निकराने लढा देत वीरगती प्राप्त झालेल्या सर्व जवानांना आणि निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या वीरांना आदरांजली वाहताना छगन भुजबळ म्हणाले की मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, पोलिस निरीक्षक विजय साळसकर, लष्कराचे एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि एएसआय तुकारम ओंबळे या सर्वांचे बलिदान देशाच्या कायम लक्षात राहील.. मुंबई पोलिसांनी दहशतवाद्यांशी दिलेला लढा मुंबईकर कधीही विसरणार नाही असा विश्वास व्यक्त करतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी इतर सर्व सुरक्षा दलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या व्यक्तींना आदरांजली वाहताना आता मुंबईकरांना पुन्हा २६/११ सारखा भ्याड हल्ला कधीही पहावा लागणार नाही असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.. मुंबई पोलिस आता योग्य ती खबरदारी घेत आहेत यात मुंबईच्या महत्वाच्या ठिकाणी २४ तास पहारा देखील दिला जात आहे, सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कोनाच्या लढाईत असो की अन्य कोणत्याही संकटात पोलीस हे नेहमीच हे सर्व सामान्य जनतेच्या पुढेच असतात याचा मला अभिमान आहे असे वक्तव्य देखील भुजबळ यांनी केले
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.