पुणे। विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारी जाहीर केली आहे. तर ही पक्षांनी त्यांच्या पक्षातील उमेदवारांना एबी फॉर्म देखील दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरून आता मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मतदारसंघ भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला होता आहे.
भाजप महाराष्ट्रात जिथे ब्राह्मण उमेदवार उभे करेल त्याठिकाणी आम्ही आमचा उमेदवार उभा करू, असे म्हणत ब्राह्मण महासंघाच्या या भूमिकेनंतर मराठा क्रांती मोर्चा प्रचंड आक्रमक झाला आहे. तसे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. हा वाद आणखीन चिघळल्यास निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो. यावर ब्राह्मण महासंघानेही भाजपवर टीका केली आहे.
दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचे चंद्रकांत पाटील यांची सोमवारी (३० सप्टेंबर) भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी करू, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनीही अशाप्रकारचे वाद हा प्रक्रियेचा एक भाग असल्याचे म्हटले. मात्र, चर्चेअंती ९० टक्के प्रश्न सुटतात. पक्ष हा कोणाचा नसतो. संघटना देते ती जबाबदारी पार पाडायची असते. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.