HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

फडणवीसांना २ तास दिले असते तर प्रश्न सुटले असते – चंद्रकांत पाटील

मुंबई | एकीकडे राज्यात कोरोना आहे तर दुसरीकडे राजकारणात अनेक गोष्टी घडत आहेत. अशात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महा वकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचे नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचे काही खरे नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त २ तास मागितले असते तर त्यांनी २ तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो, असे उद्गार त्यांनी काढले.

लॉकडाउन की अनलॉक अजून कळत नाही आहे. मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. लॉकडाउनमध्ये जेवढे कडक निर्बंध नव्हते तेवढे अनलॉकमध्ये घालून ठेवले आहेत लोकांनी नेमकी काय करायचे? असाही प्रश्न देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला पाटलांनी विचारला आहे. मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीही संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दोन तास मागितले असते, पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतो, असे टीकास्त्र भाजपने सरकारवर केले आहे.

Related posts

लोकसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणार

News Desk

संपुर्ण महाराष्ट्राचा झालाय वांदा, तरीही गोड गोड बोलणे हाच आमचा धंदा !

News Desk

जावई या नात्याने डोबिंवलीकडे लक्ष द्या…

rasika shinde