HW News Marathi
देश / विदेश

पडळकर योग्यच म्हणाले…शरद पवारांमुळेच आरक्षण मिळालं नाहीय !

मुंबई । भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान, गोपीचंद पडळकरांच्या या विधानाला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील आज (३ जून) पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही हे आमदार गोपीचंद पडाळकर यांचं म्हणणं योग्यच आहे. शरद पवार हे सगळ्याचे गॉडफादर आहेत. ठाकरे सरकारचे ते मार्गदर्शक आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचल्यानंतर मराठा आरक्षणप्रकरणात किती दिरंगाई झाली ते समजतं”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, “गोपीचंद पडळकरांनी योग्यच भूमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. यावर माझी डिबेट करायची तयारी देखील आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात पावला-पावलावर जाणवतंय की चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पडळकर काय म्हणाले होते?

शरद पवारांवर टीका करत आरक्षणाबाबत बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, “शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात जनमत नसताना घातपाताने बनलेले महाविकास आघाडी सरकार बहुजनांच्या हक्काच्या आरक्षणाच्या मुळावर उठले आहे. आधी मराठा समाजा, आता ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि बहुजनांचे पदोन्नतीतील आरक्षण संपवण्याच्या ‘कटा’चा ‘सुत्रधार’ कोण? पवार घराण्याची चाकरी करणारा कुठला सरकारी वकील आरक्षण विरोधी ‘कट-कुंभा’चा ‘कोणी’ कोण ?”, असा सवाल करत महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांच्यावर पडळकर यांनी निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांना शिवसेना संपवायची आहे !, बड्या भाजप नेत्याचा धक्कादायक दावा  

News Desk

दिल्ली-एनसीआर भागात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ३.५ इतकी भूकंपाची तीव्रता

News Desk

गुगलचा जाहीर माफीनामा

News Desk