HW News Marathi
महाराष्ट्र

सगळ्यांनी वेगवेगळे लढून पाहू, पण २ दिवस आधी सेटलमेंट करायची नाही, चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आवाहन

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा आज शेवटचा भाग प्रसारित झाला. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी सरकार बद्दल राजकीय वर्तुळात काय चर्चा होतात यावर तसेच, विरोधी पक्ष भाजप ज्या टीका करत आहे त्यावरही सडेतोड उत्तरे दिली. भाजपसोबत जाणार नव्हतो असे त्यांनी म्हटले आणि देवेंद्र फडणवीस यांना काहीही माहिती नाही असे शरद पवार म्हणाले होते. तसेच, शिवसेनेमुळे भाजपचे आमदार निवडून आले असे वक्तव्य पवारांनी केले होते त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

सामनामध्ये शरद पवार यांची ऐतिहासिक मुलाखत होणार म्हणून सामनाचा सेल वाढवला. या मुलाखती मधून सरकार स्थिर आहे, हे सरकार बदलत नाही हा संदेश द्यायचा होता. या मुलाखातीमधून प्रशासनामध्ये चलबिचल सुरू होती. ती थांबवायची होती. तुम्ही वेगवेगळे लढून पाहायला हवं होतं. महाराष्ट्रात एकदा टेस्ट होऊन जाऊ द्या, असे आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पवारांना केले आहे.

सर्वांनी वेगवेगळे लढून पाहू. प्रामाणिकपणे लढायचे. पण २ दिवस आधी सेटलमेंट करायची नाही. शरद पवार यांनी सत्तेचा दर्प म्हटले, पण लोकांनी मतपेटीतून तस काही म्हटले नाही. आम्ही काहीही म्हटले की राऊत काहीही लिहितात अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरही केली.

दरम्यान, या स्थितीत आम्ही या सरकारवर काहीही बोलणार नाही असे ठरवले आहे. पण विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडत राहणार. देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर शरद पवारांनी जे वक्तव्य केले त्यावर आपले मत मांडतील. आणि भाजप राष्ट्रवादीकडे गेले होते की राष्ट्रवादी भाजपकडे आले होते यावर तेच बोलतील, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे अकार्यक्षम सरकारच्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचे भाषण, भाजपची जहरी टीका

News Desk

“उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”, भाजपचा टोला

News Desk

NSEL घोटाळ्याप्रकरणी ED ची प्रताप सरनाईकांवर कारवाई

Aprna