HW News Marathi
महाराष्ट्र

“सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर…”,भाजपचा सरकारला गंभीर इशारा  

मुंबई | राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली असून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवदन करावं, नाहीतर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांच्या वतीने दिला आहे.

या मुद्द्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांच पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलताना “मुख्यमंत्री सत्यवादी असून कुणावरही अन्याय होऊ देणार नाही” असं म्हटलं होतं. त्याचा समाचार घेताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे हे सत्यवादी आहेत हे मान्य आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे ते नातू आहेत. पण व्यवहारात ते दिसत नाही. भूमिका घेताना त्यांना स्वत:च्या खुर्चीची काळजी आहे. त्यामुळे संजय राऊतांना ते सत्यवादी कुठे दिसले, ते माहीत नाही.”

डॉ. रोहिदास चव्हाण कुठे गायब आहेत?

दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यवतमाळमधील रोहिदास चव्हाण नामक डॉक्टरांचा देखील उल्लेख केला. “नांदेडच्या पूजा चव्हाणचा गर्भपात यवतमाळमध्ये कसा झाला? आणि गर्भपात झाल्यापासून हे डॉ. रोहिदास चव्हाण कुठे गायब आहेत?” असा सवाल चंद्राकांच पाटील यांनी केला आहे. तसेच, “पूजा चव्हाणचा मृतदेह वानवडीच्या रुग्णालयात नेला. त्या परिसरात १५० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वानवडी पोलिसांनी या १५ दिवसांत काय केलं याचा अहवाल द्यावा. ज्या दोघांना पोलिसांनी पकडलं होतं, त्यांचं काय झालं? ऑडिओ क्लिप्सविषयी देखील प्रश्न उपस्थित होत आहेत”, असं देखील ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या या सर्वांना भारतरत्न द्यावा लागेल ।सचिन सावंत

swarit

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघातः खा. अशोक चव्हाण

News Desk

आता भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे – नवाब मलिक

News Desk