HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांची धमकी तर ‘फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढू’ पटोलेंचं प्रत्युत्तर!

मुंबई। आमच्या रडारवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे, असं नाहीय. तर येत्या काही काळात 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, अशी धमकी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यांच्या याच धमकीला काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या नेत्यांनी काही केलं नाही. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण आम्ही मात्र आता फडणवीसांच्या काळातील फाईल्स बाहेर काढणार असल्याचा इशाराच आता काँग्रेसचे नाना पटोले यांनी दिला आहे.

कायदेशीर लढाईला तयार रहा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिद घेऊन घोटाळ्याचे आरोप फेटाळले. उलट चंद्रकांतदादांकडून मला भाजप प्रवेशाची ऑफर होती पण मी ती नाकारल्याने माझ्यावर ईडीच्या धाडी टाकल्या गेल्या, असा गौप्यस्फोट मुश्रीफांनी केला. मुश्रीफांच्या प्रेसनंतर चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेतली. मुश्रीफांचा दावा खोडून काढताना कायदेशीर लढाईला तयार रहा, असा इशार दिला. तर फक्त आमच्या रडारवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच आहे, असं नाहीय. तर येत्या काही काळात 2 काँग्रेस नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, अशी धमकी त्यांनी काँग्रेसला दिला.

महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहे

चंद्रकांतदादांच्या धमकीनंतर नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले. नाना पटोले म्हणाले, “भाजप लोकांची दिशाभूल करत आहेत. लोकांचे प्रश्न सोडवत नाही. किरीट सोमय्या स्टंट करत आहेत. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहेत. काँग्रेस चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेत नाही. आमच्या मंत्र्याची चूक नसल्याने घाबरण्याची गरज नाही”पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, “कॅबीनेटमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा होऊन फडणवीसांच्या काळातल्या अनेक फाईल्स तयार आहेत. त्या आता काढल्या पाहिजेत, आम्हीही जशास तसं प्रत्युत्तर देऊ, असं नाना पटोले म्हणाले.”

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या रडारवरील हे दोन नेते कोण? असा सवाल केला जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य! – चंद्रकांत पाटील

Aprna

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ? करूणा शर्मा यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

News Desk

१२ कोटी लस उपलब्ध झाले तर एकरकमी विकत घ्यायची राज्य सरकारची तयारी !

News Desk