HW News Marathi
Covid-19

छगन भुजबळ होम क्वारंटाईन, कार्यालयातील ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना 

मुंबई | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाईन झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे, छगन भुजबळ यांचे मुंबईतील कार्यालय आता १ आठवडा बंद असणार आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाचे सूक्ष्म लक्षणे आढळून आल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी, ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर, छगन भुजबळ स्वतः होम क्वारंटाइन झाले असून पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनास्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १० लाखांच्या उंबरठ्यावर आहे. या कोरोनाच्या विळख्यातून कोणीही सुटलेले नाही. राज्यातील अनेक मंत्र्यांना, त्याचप्रमाणे त्याच्या संपर्कातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे, निश्चितच हे चिंताजनक आहे. नुकतेच शुक्रवारी (११ सप्टेंबर) राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले. विश्वजित कदम हे सध्या त्यांच्या पुण्यातील घरात क्वारंटाइन झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज २,१९० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

PM Cares फंडातून औरंगाबादेतील रूग्णालयाला दिलेले व्हेंटिलेटर निकृष्ट ! सतीश चव्हाण

News Desk

कोरोनाची तिसरी लाट दारावर, मास्टर प्लॅन तयार करा !

News Desk