HW News Marathi
महाराष्ट्र

“हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर

मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांना आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबईत सांताक्रुझ येथील ९ माजली इमारतीत भुजबळ यांचं अख्खं कुटुंब राहतं. या बिल्डिंगशी त्यांचा संबंध काय? तुम्ही तुमच्या या ज्या महालात राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा आले कुठून?”, असे सवाल सोमय्या यांनी आज (१ सप्टेंबर) आपल्या नाशिकमधील पत्रकार पत्रकार परिषदेत उपस्थित केले. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या आरोपांवर आता भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आज फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न केला गेला आहे. या आरोपांमध्ये काडीमात्र तथ्य नाही”, असं भुजबळ म्हणाले आहेत.

अर्ध माळे मूळ मालकाला आणि अर्धे आम्हाला राहणार आहेत

घराबाबत किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले कि, “ते घर जुनं होतं. पुनर्बांधणीच्या स्किममधली ती इमारत आहे. ते पाडून त्यावर २.५ एफएसआय मिळतो. त्या इमारतीचे अर्ध माळे मूळ मालकाला आणि अर्धे आम्हाला राहणार आहेत.” पुढे भुजबळ म्हणाले कि, “खरंतर चार ते पाच वर्षापूर्वीच त्यांनी आमच्यावर आरोप केले. ईडीला कळवलं. प्रॉपर्टीज अटॅच करायला लावल्या. आज दाखवलेली जमीन ही नाशिकपासून २० किमी लांब आणि १९८० मध्ये घेतलेली आहे. या सगळ्याबाबत आता सेशन कोर्ट आणि हायकोर्टात केस सुरु आहे. म्हणूनच हा दबाव टाकण्याचा त्यांचा हेतू आहे का? पण, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. आम्ही लढत राहू.”

घरातच बसलो होतो का बोळ्यानं दूध पित?

भुजबळ किरीट सोमय्यांवर टीका करताना पुढे म्हणाले कि, “माझं वय ७५ आहे. त्यावेळी आम्ही १० हजार, १५ हजार रुपये एकराने घेतलेल्या जागा आहेत. त्या जागांचा भाव आता वाढला आणि ते आता तुम्ही सांगता. आम्ही ७५ वर्षे काय घरातच बसलो होतो का बोळ्यानं दूध पित? आम्ही पण काहीतरी काम धंदा केला आहे ना. अजूनही आमचे काही व्यवसाय सुरु आहेत. पण आम्ही तुमच्यासारखे खोटं बोलून, खोटे आरोप करुन बाकीचे धंदे केले नाहीत आम्ही. वारेमार आरोप करायचे हे तुमचं कामच आहे. मी याविषयी जास्त बोलणार नाही. मी फक्त इतकंच सांगेन की त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काडीमात्र देखील तथ्य नाही. आज त्यांनी फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न केला.”

भुजबळांच्या राहत्या घरीही भेट देणार

“मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी छगन भुजबळ यांची प्रचंड प्रमाणात बेनामी संपत्ती आहे”, असा आरोप करत किरीट सोमय्या यांनी आपण या संपत्तीपैकी एका ठिकाणी भेट दिल्याचंही सांगितलं आहे. त्याचप्रमाणे, येत्या शनिवारी आपण भुजबळांच्या राहत्या घरी देखील भेट देणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पेगासिस’ची चिंता सोडा, ‘पेंग्विनची’ चिंता करा; चित्रा वाघ यांचं राऊतांवर हल्ला

Jui Jadhav

नांदेड जिल्ह्यातील अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला इशारा  

News Desk

बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत रणजितसिंह देशमुख यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

News Desk