HW News Marathi
देश / विदेश

छत्रपतींची तुलना मोदीचं काय,कोणाशीचं होऊ शकत नाही..

बुलढाणा | छत्रपती शिवाजी महाराजांशी थेट तुलना करणारे पुस्तक आज भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. भाजपच्या कार्यालयामध्ये जे पुस्तक प्रकाशित झाले आहे ते चालणार नाही, राष्ट्रीय अध्यक्षांनी त्या पुस्तकावर ताबडतोब बंदी घालावी आणि हे पुस्तक बाजारात येता कामा नये असा इशाराही भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी बुलढाणा येथे दिला. त्याचपद्धतीने छत्रपतींची तुलना मोदीचं काय परंतु कोणाशीचं होऊ शकत नाही अशा शब्दांमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ यांच्य जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संभाजीराजेंनी आपला संंताप व्यक्त केला. मी छत्रपतींच्या घरात जन्म घेतला आहे . त्यामुळे मला हे बोलण्याचा अधिकार आहे,असे म्हणत त्यांनी भाजपचा हा मुजोरीपणा खपवुन घेतला जाणार नाही असा सज्जड दम भरला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा गेला, आता बळीराजाची दिवाळी तरी गोड करा ! पंकजांनी घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट 

News Desk

सोनियांचं पत्र म्हणजे दबावतंत्र नाही | संजय राऊत

News Desk

UP Election 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात ११ वाजेपर्यंत २०.०३ टक्के मतदान

Aprna