HW News Marathi
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी घेतले केदारनाथचे दर्शन

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकाला लागण्यापूर्वी केदारनाथला जाऊन पूजा आणि ध्यान-धारणा केली होती. त्याचप्रमाणे आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल (२३ ऑक्टोबर) सकाळी केदारनाथला जाऊन दर्शन घेतले. सकाळी त्यांनी केदारनाथचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः टि्वट करत याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी काल सकाळी केदारनाथचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. ‘हर हर महादेव’ असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता फडणवीसही त्यांच्यासोबत केदारनाथला जाऊन पूजा आणि ध्यान-धारणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज (२४ ऑक्टोबर) निकाल लागणार आहे. राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येत असल्याचा अंदाज विविध एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले राज्य महाराष्ट्र विधानसभा निकालाकडे देशाचे लक्ष आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यानंतर पुन्हा प्रचारसभेसाठी ते राज्यात फिरले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वांना 24 तास वीज

News Desk

खुशखबर…१ जानेवारीपासून लागू होणार सातवा वेतन आयोग

News Desk

मराठा आरक्षणाची स्थगिती हटवण्यसाठी राज्य सरकारचा सर्वोर्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल

News Desk