HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो !

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (२ डिसेंबर) पत्रकार परिषद बोलविली होती. यात पाटील यांनी म्हटले की, “पंकजांच्या पक्षांतराच्या बातम्या या केवळ अफवा असून त्या भाजपमध्ये होत्या, आहेत आणि राहतील,’ असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंच्या या ट्विटला रिप्लाय दिल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

पंकजा मुंडेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर भाजपच्या नेत्या असल्याचा उल्लेख केला नाही. दरम्यान पंकजा मुंडे यांनी काल (१ डिसेंबर) फेसबुक पोस्ट लिहून, १२ डिसेंबरला भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची जन्मदिवस असून या दिवशी सर्व कार्यकर्त्यांना  गोपीनाथगडावर भेटू, असे आव्हान केले आहे.  “पंकजाच काय अनेक भाजप नेते शिवसेनेच्या संपर्कात,” असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांनी पत्रकार परिषदेत पंकज मुंडे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले होते.

पंकजा मुंडेंचे ट्विटमध्ये नेमके काय म्हटले

आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!’, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले

पंकजा मुंडेंच्या ट्विटला उद्धव ठाकरेंनी काय रिप्लाय दिला

“आपले मनःपूर्वक धन्यवाद पंकजा ताई मुंडे! ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो,” असा रिप्लाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

 

 

Related posts

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध

News Desk

Hw Exclusive | अमोल कोल्हेंच्या डाॅ. पत्नी केईएममध्ये निभावतायतं कर्तव्य !

Arati More

रथाची चाके कुठे अडकू नयेत म्हणून या शुभेच्छा!

News Desk